Nanded | अंनिसचं नांदेडमध्ये स्टिंग ऑपरेशन, भोंदूबाबाचं पितळ उघड
कासराळीच्या तौफिक बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती (Andhashraddha Nirmoolan Samiti) आणि पोलिसां(Police)नी भांडाफोड केला आहे. स्टिंग (Sting) ऑपरेशन केल्यानंतर या प्रकरणात भोंदू तौफिक बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुर्धर आजारावर उपचार करण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळण्यासोबतच जादूटोणा आणि करणी झाल्याची भीती दाखवून गंडविणाऱ्या नांदेडमधील कासराळीच्या तौफिक बाबाचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती (Andhashraddha Nirmoolan Samiti) आणि पोलिसां(Police)नी भांडाफोड केला आहे. स्टिंग (Sting) ऑपरेशन केल्यानंतर या प्रकरणात भोंदू तौफिक बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कासराळी येथील दस्तगीर दर्ग्यावर तौफिक बाबाने आपले बस्तान बसविले होते. या बाबाकडे दैनंदिन स्वरुपाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यावर तो अनेकांना करणी आणि जादूटोणा करत होता. तसेच पैशांची मागणी करीत होता. दुर्धर आजारावरील उपचारासाठी पाचशे एक रुपयांपासून ते एक हजार रुपये उकळत होता. त्यामुळे गावात करणी आणि जादूटोणा केल्याच्या संशयावरुन वाद होत होते. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर स्टिंग ऑपरेशन करून या भोंदूबाबाचा भांडाफोड करण्यात आला.