Maharashtra Budget 2023 : बस, रेल्वे आणि विमानतळासाठी सरकारच्या योजना काय?

Maharashtra Budget 2023 : बस, रेल्वे आणि विमानतळासाठी सरकारच्या योजना काय?

| Updated on: Mar 09, 2023 | 4:05 PM

Maharashtra Budget 2023 : नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार , पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे. सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी २५ नवीन उड्डाणपूल बांधण्यात येतील. पाहा...

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर केला गेला. यात वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाला ५,१५० इलेक्ट्रीक बसेस मिळणार आहेत. लिक्वीड डीझेलच्या ५,००० नव्या बसेस मिळणार आहेत. १०० बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे ४०० कोटींची घोषणा करण्यात आली आहे. रेल्वे प्रकल्प आधुनिकीकरणीकरणासाठी तरतूद करण्यात आल्या आहेत. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी निधीची घोषणा झाली आहे. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज ४५२ कोटी रुपये, नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या प्रकल्पांना ५० टक्के हिस्सा देण्यात येणार आहे. शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनलसाठी 527 कोटी, नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी, छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी 734 कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

Published on: Mar 09, 2023 04:05 PM