Video: आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदेगटाची घोषणाबाजी

Video: आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदेगटाची घोषणाबाजी

| Updated on: Aug 25, 2022 | 2:24 PM

आज विधिमंडळ अधिवेशनाचा (Maharashtra Assembly) सहावा आणि शेवटचा दिवस आहे. आज सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि विशेषत: माजी मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी त्यांच्या हातात एक पोस्टर पाहायला मिळालं. यावर आदित्य ठाकरेंचं व्यंगचित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) गाढवावर उलटे बसलेले दिसत […]

आज विधिमंडळ अधिवेशनाचा (Maharashtra Assembly) सहावा आणि शेवटचा दिवस आहे. आज सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि विशेषत: माजी मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी त्यांच्या हातात एक पोस्टर पाहायला मिळालं. यावर आदित्य ठाकरेंचं व्यंगचित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) गाढवावर उलटे बसलेले दिसत आहेत. आदित्य ठाकरेंची दिशा चुकली. पर्यावरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

 

 

Published on: Aug 25, 2022 02:24 PM