पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल? अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्या चुरस; निकालाकडे राज्याचं लक्ष
Pimpari Chinchwad By Election 2023 Results : राज्यातील वरिष्ठ नेते या निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. त्यामुळे याठिकाणी नाकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाहा व्हीडिओ...
पिंपरी चिंचवड : भाजपचे नेते लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवड मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडतेय. यासाठी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे ही निवडणूक त्रिकोणी होण्याच्या शक्यता आहे. या पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार आहे. थोड्याच वेळात सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. शंकर गावडे कामगार भवनात ही मतमोजणी होणार आहे. सुरूवातीला टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येईल. यानंतर 14 टेबलवर पहिली फेरी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होतील.
Published on: Mar 02, 2023 08:10 AM
Latest Videos