Assembly Session : लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
Assembly Session Updates : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात आज लक्षवेधीवरून विरोधकांनी सभागृहात चांगलाच गदारोळ घातलेला बघायला मिळाला.
राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आज देखील विरोधक आणि सत्ताधारी पक्षांत गदारोळ झालेला बघायला मिळाला. 3 हून अधिक लक्षवेधी मांडण्याच्या मुद्यावरून विधानसभेत हा गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हा मुद्दा उपस्थित करताना म्हणाले की, आज डिमांडवर चर्चा आहे. 4 विषयांची चर्चा होणार आहे. त्यानंतर 4 प्रस्ताव आपण क्लब केलेत. त्यावर चर्चा करण्यास सर्व सदस्य उत्सुक आहेत. विधानसभा कामकाजाच्या नियमानुसार एका दिवशी केवळ 3 लक्षवेधी घेता येतात. प्रत्येक लक्षवेधीला 10 मिनिटांचा वेळ दिला जातो. पण आज आपण 35 लक्षवेधी घेतल्या. जयंत पाटील यांनी यासंबंधीचा कामकाजाचा नियमच वाचून दाखवला. त्याचे ठाकरे गटाच्या सदस्यांनीही समर्थन केले. यावेळी थोडासा गदारोळ झाला.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?

नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'

औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?

नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
