त्या कीर्तनकारावर कठोर कारवाई करण्याची Trupti Desai यांची मागणी
महिलेसोबत केलेल्या संभोगाचा व्हिडीओ व्हायरल (Aurangabad Viral Video) केल्याप्रकरणी कीर्तनकारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.
पुणे : महिलेसोबत केलेल्या संभोगाचा व्हिडीओ व्हायरल (Aurangabad Viral Video) केल्याप्रकरणी कीर्तनकारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन करत तृप्ती देसाईंनी मागणी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकाराने (Kirtankar) महिला कीर्तनकारासोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. त्याची ही कृती कीर्तनकार पेशा, महिलांची प्रतिष्ठा आणि सामाजिक नीतीमूल्ये यांना पायदळी तुडवणारी असल्याची टीका देसाईंनी केली आहे. या कीर्तनकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडने केली आहे. दोघांच्या संमतीने चार भिंतीच्या आत जी नैसर्गिक क्रिया केली आहे, त्याचा सार्वजनिक व्हिडीओ चित्रित करुन व्हायरल करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे, असंही त्या म्हणाल्या.