आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, मुख्यमंत्री म्हणाले…

| Updated on: Apr 10, 2023 | 9:03 PM

VIDEO | ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार, कधी आणि कुठे होणार पुरस्कार सोहळा?

मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. १६ एप्रिल रोजी मुंबईतील खारघरमध्ये हा पुरस्कार सोहळा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून या सोहळ्यात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा आज घेतला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च मानला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणार आहे. या सोहळ्याला साधारण २० लाखांपेक्षा श्रीसदस्य उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याचे नियोजन नीट असावे, म्हणून आज तयारीची बैठक घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Published on: Apr 10, 2023 09:02 PM
निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, पक्षाच्या राष्ट्रीय दर्ज्याबाबत मोठा निर्णय
‘भूक मंत्रीपदाची नाही तर…’, शिवसेनेच्या आमदारानं नाराजीच्या मुद्यावर विरोधकांना स्पष्टच सुनावलं