राजधानी विषारी वायुच्या विळख्यात, मुंबईच्या ‘या’ भागात सर्वाधिक प्रदूषित हवा
राज्याची राजधानी मुंबई मागच्या काही दिवसांपासून विषारी वायुच्या विळख्यात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. पाहा व्हीडिओ...
राज्याची राजधानी मुंबई मागच्या काही दिवसांपासून विषारी वायुच्या विळख्यात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. चेंबूरमधील हवेची गुणवत्ता अधिकच खालावली आहे. मुंबईतील हवेचा दर्जा शनिवारी किंचित सुधारणा झाली आहे. पण हवेतील धुलिकणांचं प्रमाण कमी झालेलं असलं तरी माजगाव, चेंबूरमधल्या हवेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. शुक्रवारी हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 303 एक्यूआय इतका नोंदवण्यात आला होता तर काल हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 245 (प्रदूषित) इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे गुणवत्तेत जरी थोडीफार सुधारणा झाली असली तरी मुंबईतील हवा अद्यापही प्रदूषित श्रेणीत आहे.
Published on: Jan 22, 2023 08:11 AM
Latest Videos