Maharashtra CM Oath Ceremony | एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, राज्यपालांनी दिली पद आणि गोपनियतेची शपथ

Maharashtra CM Oath Ceremony | एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, राज्यपालांनी दिली पद आणि गोपनियतेची शपथ

| Updated on: Jun 30, 2022 | 11:13 PM

मोठ्या राजकीय नाट्यानंतर राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार येणार हे निश्चित होतं. त्यानुसार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे संध्याकाळी राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अनपेक्षितपणे फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. तसंच आपण सत्तेबाहेर राहणार असून सरकार चालावे ही आपली जबाबदारी असल्याचंही फडणवीस म्हणाले. मात्र, भाजपच्या केंद्रीय स्तरावर मोठ्या हालचाली झाल्या आणि त्यांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी होण्याचे आदेश दिले. या राजकीय नाट्यानंतर राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

Published on: Jun 30, 2022 10:54 PM