बागेश्वर बाबांवरून नाना पटोलेंचा भाजपवर निशाना; म्हणाले...

बागेश्वर बाबांवरून नाना पटोलेंचा भाजपवर निशाना; म्हणाले…

| Updated on: Mar 20, 2023 | 7:53 AM

पटोले यांनी, आमचा बागेश्वर बाबाला विरोध नाही. बागेश्वर बाबाने सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अपमान केला. त्याने फक्त महाराजांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान केल्याचे म्हटले आहे

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बागेश्वर धामचे धिरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर हल्लाबोल केला होता. तर त्यांच्या मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला आहे. ज्यामुळे वारकरी समाजातील लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असेही पटोले यांनी म्हटले होते. त्यानंतर आता पटोले यांनी आमचा बागेश्वर बाबाला विरोध नाही असं म्हटलं आहे. ज्यामुळे राजकीय तापमान वाढताना दिसत आहे.

पटोले यांनी आमचा बागेश्वर बाबाला विरोध नाही. बागेश्वर बाबाने सर्वश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अपमान केला. त्याने फक्त महाराजांचा नाही तर महाराष्ट्राचा अपमान केल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःला हिंदूवादी म्हणणारी बीजेपीचं असली रूप जनतेच्या समोर आला आहे. त्यांना अशा प्रकारचे महाराज चालतात का? असा सवालही पटोले यांनी केला आहे.