लोक शिव्या देतात म्हणून 'ते' रडले; पंतप्रधानांवर राऊतांची खरमरीत टीका

लोक शिव्या देतात म्हणून ‘ते’ रडले; पंतप्रधानांवर राऊतांची खरमरीत टीका

| Updated on: May 01, 2023 | 12:06 PM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना संविधानावर अजिबात प्रेम नाही. तर लोक शिव्या देतात म्हणून आपले पंतप्रधान रडतात अशी खरमरीत राऊत यांनी टीका केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din) महाविकास आघाडीची मुंबईत वज्रमूठ सभा होत आहे. त्याच्या आधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही सभा संविधान आणि महाराष्ट्र रक्षणासाठी घेत असल्याचे म्हटलं आहे. तसेच त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह यांना संविधानावर अजिबात प्रेम नाही. तर लोक शिव्या देतात म्हणून आपले पंतप्रधान रडतात अशी खरमरीत टीका केली आहे. यावेळी राऊत यांनी पंतप्रधानांचं संविधानापेक्षा मन की बातवर जास्त प्रेम आहे. जर संविधानावर प्रेम असतं तर लोक शिव्या देतात असं पंतप्रधान यांना भर सभेत सांगावं लागलं नसतं. त्यांना ९१ शिव्यांची यादी वाचून दाखवण्याची वेळ आली नसती असाही टोला राऊत यांनी लगावला. त्याचबरोबर राऊत यांनी प्रियंका गांधी याचं नाव घेत, त्यांनी मोदी यांनी उत्तर दिलं आहे. पण असा रडणारा पंतप्रधान देशाने प्रथमच पाहिला आहे. लोक शिव्या देतात म्हणून ते रडले. आजपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांवर टीका झाली आहे. पण कोणताही पंतप्रधान कधी रडला नाही.

Published on: May 01, 2023 12:05 PM