Video : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन
Maharashtra Din : महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुत्मात्यांना यावेळी अभिवादन करण्यात आलं.
मुंबई : हुतात्मा चौकातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त अभिवादन केलं. महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुत्मात्यांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. यावेळी खासदार अरविंद सावंत यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे सचिवही उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य स्थापनेचाा 62 वा वर्धापन दिन सोहळा राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. त्यानिमित्त राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र (Maharashtra) स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यातची निर्मिती झाली.