मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा अयोध्या दौरा ही शोकांतिका; काँग्रेसची टीका
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा अयोध्या दौरा हा भावनिक विषय असून शकतो. मात्र तो दौरा आजच्या तारखेला नको होता. सुजाण आणि सुशिक्षित राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. मात्र याच राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
वर्धा : महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. राज्यात गारपीट, अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले हा शोकांतिकेचा विषय आहे. फक्त वरिष्ठांना खुश करण्यासाठी दौरे करायचे, अयोध्येला जायचे हे योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. राज्यात असे चित्र असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर आहेत ही खेदाची बाब असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा अयोध्या दौरा हा भावनिक विषय असून शकतो. मात्र तो दौरा आजच्या तारखेला नको होता. सुजाण आणि सुशिक्षित राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. मात्र याच राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वास्तविक त्यांनी येथे राहायला पाहिजे होते. पण वरिष्ठांना खुश करण्यासाठी दौरे करायचे, अयोध्येला जायचे हे योग्य नाही, असही खासदार धानोरकर म्हणाले.