महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात...

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात…

| Updated on: Mar 09, 2023 | 2:33 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी तुकाराम महाराज यांच्या विचारांचा संदर्भ फडणवीसांनी दिला...

मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. हा अर्थसंकल्प सादर करण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सांस्कृतिक इतिहास सांगितला. “आज जगतगुरू तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचा दिवस अर्थात तुकाराम बीज आहे. भागवत धर्मात आदराचं स्थान असलेल्या आणि आपल्या विचाराने महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या जगतगुरू तुकाराम महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. तुकोबारायांनी जो संदेश दिला आहे, ‘टिकवावे धन, ज्याची आस करी जन’, या तत्वाला अनुसरून राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली.

Published on: Mar 09, 2023 02:33 PM