पहिला उद्योगरत्न पुरस्कार उद्योजक रतन टाटा यांना जाहीर; राज्य सरकारकडून मोठी घोषणा

पहिला उद्योगरत्न पुरस्कार उद्योजक रतन टाटा यांना जाहीर; राज्य सरकारकडून मोठी घोषणा

| Updated on: Jul 28, 2023 | 9:15 AM

सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली.

मुंबई, 28 जुलै 2023 | सुप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. राज्य शासनाच्या वतीने यावर्षीपासून ‘महाराष्ट्र भूषण’च्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी रतन टाटा यांची निवड करण्यात आली आहे. तरुण, महिला तसेच मराठी उद्योजक अशा तीन प्रवर्गासाठी आणखी तीन पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Published on: Jul 28, 2023 09:14 AM