महाराष्ट्राला पुन्हा एकदा मिळणार नवीन राज्यपाल? कार्यमुक्तीच्या हालचील सुरू?
VIDEO | गेल्या काही दिवसांपूर्वी भगतसिंह कोश्यारी पायउतार झाले, त्यानंतर रमेश बैस आले; आता पुन्हा नव्या राज्यपालांची चर्चा?
मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांची उचलबांगडी झाल्यानंतर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता राज्यपाल रमेश बैस हे लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त होणार असल्याचे सांगितले जात आहे. तशा हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे राज्याला नवे राज्यपाल मिळणार आहेत. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, छत्तीसगड जिंकण्यासाठीच रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून कार्यमुक्त केलं जाणार आहे. त्यामुळे राज्यात नवे राज्यपाल म्हणून कोण येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लवकरच महाराष्ट्रातही निवडणुका होऊ घातल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्रातील सत्ताकारणाचं भविष्य अवलंबून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या नेत्यालाच राज्यपाल म्हणून पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.