Anil Deshmukh : पंचनाम्यांचे अहवालानंतर तातडीनं मदत द्या; नाही तर... ; माजी गृहमंत्र्यांचा सरकारला डोस

Anil Deshmukh : पंचनाम्यांचे अहवालानंतर तातडीनं मदत द्या; नाही तर… ; माजी गृहमंत्र्यांचा सरकारला डोस

| Updated on: Apr 13, 2023 | 9:19 AM

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ अयोध्येला दौऱ्यावर गेलं होतं. आता ते परत आलेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे आता पंचनाम्याचे करण्याचे काम सुरू आहे. ते होतील आणि ते शासनाकडे जातील. रिपोर्ट गेल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या.

वर्धा : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, गारपीट झाली. त्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र यावर शेतकऱ्यांना धीर न देता अख्ख मंत्रीमंडळच अयोध्या दौऱ्यावर गेलं असं म्हणत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ अयोध्येला दौऱ्यावर गेलं होतं. आता ते परत आलेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे आता पंचनाम्याचे करण्याचे काम सुरू आहे. ते होतील आणि ते शासनाकडे जातील. रिपोर्ट गेल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका असा दमच देशमुख यांनी भरला आहे. तर शेतकऱ्यांत मोठी नाराजी निर्माण झाली असून पंचनामे होताच मदत द्या असेही ते म्हणाले.

Published on: Apr 13, 2023 09:19 AM