Maharashtra: मंत्रिपदावरून माझी कुठलीही नाराजी नाही- बच्चू कडू

| Updated on: Aug 10, 2022 | 12:15 PM

पुढच्या विस्तारात सर्वांनाच स्थान मिळेल. त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे बच्चू कडू म्हणाले. सत्तेत असणाऱ्या पक्षासोबत साहुं मतदार संघाचा विकास करायचा असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

काल शिंदे गट आणि भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला यामध्ये एकूण 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ ग्रहण केली. शिंदे गटातले नऊ आणि भाजपमधले नऊ असे एकूण आमदार यात होते, मात्र अपक्ष आमदारांना या विस्तारात संधी मिळाली नसल्याने नाराजी असल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकत होत्या. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिपदाचा संपूर्ण विस्तार होणे अजून बाकी आहे. पुढच्या विस्तारात सर्वांनाच स्थान मिळेल. त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असे बच्चू कडू म्हणाले. सत्तेत असणाऱ्या पक्षासोबत राहून मतदार संघाचा विकास करायचा असल्याचे बच्चू कडू म्हणाले. शेतीचे कामं रोजगार हमी योजने अंतर्गत यावे या मुद्यावर चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांना भेटले.

Published on: Aug 10, 2022 12:13 PM