आम्ही तिन्ही पक्ष एकत्रच, चंद्रकांतदादा यांचं 'ते' वक्तव्य चुकीचंच; एकनाथ खडसे यांचं प्रत्युत्तर

आम्ही तिन्ही पक्ष एकत्रच, चंद्रकांतदादा यांचं ‘ते’ वक्तव्य चुकीचंच; एकनाथ खडसे यांचं प्रत्युत्तर

| Updated on: Apr 11, 2023 | 12:44 PM

Eknath Khadse on Chandrakant Patil : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत? पाहा...

मुक्ताईनगर, जळगाव : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेगट हे तिन्ही पक्ष राज्यात एकत्र राहतील आणि 2024 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत येईल, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. राज्यात महाविकास आघाडी मजबूत आहे. तीन पक्ष एकत्र राहणं अवघड आहे, असं चंद्रकांतदादांचं म्हणणं आहे. तर त्यांना मला सांगायचंय की, याआधी देशात 32 पक्ष हे एकत्र होते. देशभरातील 32 पक्ष एकत्र करून अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते. मग तीन पक्ष एकत्र न राहण्याचे कारण काय?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला आहे.

Published on: Apr 11, 2023 12:44 PM