जळगावमध्ये अवकाळी पाऊस, शेतीचं नुकसान; उभी पिकं जमीनदोस्त

जळगावमध्ये अवकाळी पाऊस, शेतीचं नुकसान; उभी पिकं जमीनदोस्त

| Updated on: Apr 10, 2023 | 10:34 AM

Jalgoan Unseasonal Rain : जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पाहा व्हीडिओ...

मुक्ताईनगर, जळगाव : जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मका, हरभरा, गहू, केळी ,मिरचीचं प्रचंड नुकसान झालंय. पिकं जमीन दोस्त झाली आहेत. गाव खेड्याला जोडणाऱ्या रस्त्यावर झाडं पडल्याने वाहतूक थांबली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालं आहे. मुक्ताईनगरमधील कु-हा काकोडा परिसरातील सुळे ,रिगाव ,कोराळा भोटा तालुक्यातील अनेक भागात फटका बसला आहे. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच्याच नुकसानीची अद्याप मदत मिळालेली नसताना आता हे दुसरं संकट शेतकऱ्यावर कोसळलं आहे.

Published on: Apr 10, 2023 10:28 AM