‘महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच.., ‘ काय म्हणाले नरेंद्र मोदी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभा सुरु झालेल्या आहेत. काल धुळे आणि नाशिक येथे नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या. यात मोदी यांनी कॉंग्रेसवर चौफेर टीका केली. आज नरेंद्र मोदी यांनी अकोल्यातील सभेत महाराष्ट्रातील जनतेचे कौतूक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा झाल्या. आज अकोला येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी जय श्रीरामचा नारा दिला. 9 नोव्हेंबर रोजी राम मंदिराबाबत कोर्टाने निकाल महत्वाचा निकाल दिला, त्याला देशातील सर्व धर्मांनी स्वागत करीत पाठींबा दिला. साल 2014 ते 2024 या दहा वर्षांत महाराष्ट्राने भाजपाला साथ दिली आहे. कारण महाराष्ट्रातील जनतेला राजकीय समज आहे. आणि ती देशप्रेमी आहे. म्हणून मला महाराष्ट्रासाठी सेवा करण्यास अधिक सुख मिळते, त्यामुळे महाराष्ट्रासाठी सर्वाधिक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प आपण मंजूर केले आहेत. एकट्या वाढवण बंदरात केंद्राने 80 हजार कोटी गुंतवणूक केलेली आहे. वाढवण बंदर देशातील सर्वात मोठे बंदर होणार असून देशातील सर्व बंदराची होणारी कामे आणि एकट्या वाढवण बंदरातून होणारे काम तुलनेने एकच असणार आहे इतके हे बंदर भव्य होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला येथील सभेत सांगितले.