Maharashtra Lockdown | अर्ध्या महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन, राज्यातील 17 शहरांमध्ये काय सुरु? काय बंद?
वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. अशावेळी आता जिल्हा पातळीवर लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. Maharashtra Lockdown news
मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. अशावेळी आता जिल्हा पातळीवर लॉकडाऊन वाढवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. आज नाशिक, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, वाशिम, सातारा, सोलापूर आणि वर्धा यासह एकूण 17 ठिकाणी कडक लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विचाराने हा निर्णय घेण्यात येत आहे.
Latest Videos