महाराष्ट्रात 13 जागांसाठी लोकसभेचं मतदान, त्यापैकी 6 जागा मुंबईच्या; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

| Updated on: May 20, 2024 | 1:32 PM

राज्यात आज १३ मतदारसंघात लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. या १३ जागांपैकी सहा जागांवर मुंबई या मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाण्यासह मुंबईतील सहा मतदारसंघात हे मतदान होत आहे. मुंबईत शिवसेना विरूद्ध शिवसेना असाही रंगत असल्याने सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे.

Follow us on

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी आज १३ जागांवर शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यात आज १३ मतदारसंघात लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. या १३ जागांपैकी सहा जागांवर मुंबई या मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाण्यासह मुंबईतील सहा मतदारसंघात हे मतदान होत आहे. मुंबईत शिवसेना विरूद्ध शिवसेना असाही रंगत असल्याने सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे. तर संपूर्ण १३ जागांवर होणाऱ्या मतदानात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी सात वाजेपासून ही मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून कोणाची कोणासोबत टक्कर पाहायला मिळणार आहे, जाणून घ्या… उत्तर मुंबईतील मतदारसंघात भाजपचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील, उत्तर पूर्व मुंबईतून भाजपचे मिहीर कोटेचा विरूद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाचे रवींद्र वायकर विरूद्ध ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर, दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरूद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई, तर दक्षिण मुंबईतून शिंदे गटाच्या यामिनी जाधव आणि ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार आहेत.