राज्यात H3N2 इन्फ्लुएन्झाचा पहिला बळी; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं महत्वाचं आवाहन
H3N2 influenza : एच 3 एन 2 इन्फ्लुएन्झा या विषाणूचा राज्यात पहिला बळी गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी महत्वपूर्ण आवाहन केलं आहे.
मुंबई : H3N2 इन्फ्लुएन्झा या विषाणूचा राज्यात पहिला बळी गेला आहे. अहमदनगरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या 23 वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या पार्श्वभूमीवर महत्वाचं आवाहन केलं आहे. H3N2 मृत्यू होत नाही. तो रूग्ण 2 दिवसांत बरा होता. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ज्या ठिकाणी असे संशयित रुग्ण आढळून येतील, त्यांच्यावर उपचार केले जातील. आजार अंगावर काढू नका. खबरदारी घ्या. ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या”,असं आवाहन तानाजी सावंत यांनी केलं आहे. “12 मार्चला राज्यात 352 रुग्ण होते. त्यातील एकाचा आज मृत्यू झाला. तो मुलगा परीक्षा संपल्यानंतर मित्रांसोबत फिरण्यासाठी आला होता. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला”, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
Published on: Mar 15, 2023 02:11 PM
Latest Videos