आधी सीसीटीव्हीला चुना फासला अन् मग सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला, पाहा व्हीडिओ...

आधी सीसीटीव्हीला चुना फासला अन् मग सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Mar 04, 2023 | 10:00 AM

नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात मोठी चोरी झाली आहे. दानपेटीतील पैसे आणि दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. पाहा व्हीडिओ...

नाशिक : नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात चोरी झाली आहे. सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारलाय. या चोरीआधी मंगिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासण्यात आलं आणि मग चोरट्यांनी ही चोरी केलीय. सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही असतानादेखील चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 13 फेब्रुवारीला घटना घडून देखील अद्याप गुन्हा दाखल नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मंदिराचे विश्वस्त अॅड. दीपक पाटोदकर यांनी संस्थान अध्यक्षांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्र लिहिलं आहे. दरम्यान, दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत होत्या.