Special Report | ना युती, ना आघाडी! आगामी निवडणुकीत, मनसेचा एकला चलो रे चा नारा

Special Report | ना युती, ना आघाडी! आगामी निवडणुकीत, मनसेचा एकला चलो रे चा नारा

| Updated on: Jul 15, 2023 | 7:34 AM

याचदरम्यान राज्यातील अनेक भागात आणि जिल्ह्यात सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी मनसेसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे. यामागणीसाठी अनेक ठिकाणी पोस्टर्स लागले आहेत.

मुंबई : महाराष्ट्र नव निर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संघटना बांधणीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे आज दापोलीत आहेत. याचदरम्यान राज्यातील अनेक भागात आणि जिल्ह्यात सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी मनसेसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे. यामागणीसाठी अनेक ठिकाणी पोस्टर्स लागले आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट संकेत राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यात दिले आहे. याबाबत त्यांनी, “सध्या राजकारणात जे काही सुरू आहे. त्यामुळे कुणाबरोबर मी जाईल हे मला वाटत नाही. तसेच लोकसभा निवडणूक ही लोकसभा निवडणूक असते. या निवडणुकीत एकच भूमिका असते. एका जिल्ह्यासाठी एक आणि दुसऱ्या जिल्ह्यासाठी दुसरी असं काही नसतं. तसेच येत्या 10 ते 15 दिवसात मी मेळावा घेणार आहे. यावेळी मी जे काय आहे ते स्पष्ट सांगणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.” त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jul 15, 2023 07:34 AM