Special Report | खेकडे पुराणावरून ठाकरे यांच्यावर भाजप-शिंदे गटासह टीकेचा भडीमार; मनसेकडून मिमिक्री
तर ठाकरे यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विडंबन करण्यात आलं. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे तर त्यांच्या एका मित्राने संजय राऊत यांचे पात्र स्वीकारले.
मुंबई, 27 जुलै 2023 | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एक प्रखर मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाला. मुलाखतीच्या पहिल्या भागातून उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरून भाजपसह शिंदे गटाने खिल्ली उडवली होती. तर ठाकरे यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विडंबन करण्यात आलं. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे तर त्यांच्या एका मित्राने संजय राऊत यांचे पात्र स्वीकारले. अवघ्या दोन मिनिटांच्या मुलाखतीत ठाकरे यांच्या मुलाखतीचे विडंबन करण्यात आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तर या विडंबनावरून ठाकरे बंधू आणि त्यांची शिवसेना मनसे हे दोन्ही पक्ष आता आमने-सामने आले आहेत. देशपांडे यांनी ठाकरे यांच्यावर मिमिक्रीकरत खिल्ली उडवली आहे. त्यावरून शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी जाधव यांनी मनसेला फक्त मिमिक्री करायला, टिंगलटवाळी करायला जमतं असा टोला लगावला आहे. दरम्यान यावरून आता पुन्हा एकदा राजकारण जोरदार तापण्याची शक्यता आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट