वर्षा बंगल्यावर आज राज ठाकरे जाणार; मनपा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला होणार प्रारंभ
या भेटीगाठींकडे साऱ्या राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी काळातील महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज ठाकरे मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
गणेशोत्सवाबरोबच राजकीय चर्चेनाही आता उधान आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाणार असल्याच सांगण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिंदे आणि भाजप गटातील आमदारांसाठी स्नेहभोजणाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ आल्या असल्याने त्यामुळे या भेटीगाठींकडे साऱ्या राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी काळातील महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज ठाकरे मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
Published on: Sep 06, 2022 12:04 PM
Latest Videos