नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा थोड्याच वेळात शपथविधी; कोण उपस्थित राहणार? पाहा...

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा थोड्याच वेळात शपथविधी; कोण उपस्थित राहणार? पाहा…

| Updated on: Feb 18, 2023 | 12:19 PM

राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा आज शपथविधी समारंभ आहे. दुपारी साडे बारा वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा आज शपथविधी समारंभ आहे. दुपारी साडे बारा वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनात या शपथविधीची पूर्ण तयारी झाली आहे. राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे भगत सिंग कोशयारी यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ चर्चेत राहिला. आज नवे राज्यपाल रमेश बैस हे राज्यपाल म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात नव्या राज्यपालांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं असेल. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Published on: Feb 18, 2023 12:08 PM