ठाण्यात मुख्यमंत्री कार्यालय होणार; इमारत उभारणीसाठी ‘इतक्या’ कोटींचा खर्च
Chief Minister Eknath Shinde Office in Thane : ठाण्यात नवं कोट्यावधी रुपये खर्च करून मुख्यमंत्री कार्यालय उभारलं जाणार आहे. पाहा व्हीडिओ...
निखील चव्हाण, ठाणे : ठाण्यासह राज्यासाठी महत्वाची बातमी. मुख्यमंत्री कार्यालयात काम असेल तर ठाणेकरांना आता मुंबईत यावं लागणार नाही. कारण आता ठाण्यात मुख्यमंत्री कार्यालय उभारलं जाणार आहे. ठाण्यातील कशिश पार्क इथं असलेल्या प्रशासकीय इमारत परिसरात मुख्यमंत्री कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचं कार्यालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण 4 कोटी 60 लाख इतका खर्च येणार आहे. कार्यालयाच्या अंतर्गत कामं तसंच संगणक प्रणाली आणि इतर कामासाठी ठाणे महापालिकेकडून याची निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा 3 मे पर्यंत स्वीकारली जाणार आहे. तर यापुढे राज्याचा कारभार हा ठाण्यातून देखील होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयातील कामासाठी ठाणेकरांना मुंबईत येण्याची आवश्यकता नाही.
Published on: Apr 27, 2023 11:34 AM
Latest Videos