राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; ठाकरे गटाकडून जोडपत्र सर्वोच्च न्यायलयात सादर

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; ठाकरे गटाकडून जोडपत्र सर्वोच्च न्यायलयात सादर

| Updated on: Mar 14, 2023 | 9:39 AM

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या संदर्भात ठाकरे गटानं आज सुप्रीम कोर्टात जोडपत्र सादर केलं आहे. पाहा...

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. या संदर्भात ठाकरे गटानं आज सुप्रीम कोर्टात जोडपत्र सादर केलं आहे. पाच मुद्दे पुन्हा जोडपत्रातून मांडण्यात आले आहेत. आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना आमदारांनी कार्यवाही केली. राज्यपालांनी अधिकारांचा गैरवापर करत बहुमत चाचणी बोलावली. अध्यक्षीय निवडणुकीत अपात्र आमदारांनी मतदान केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली, हे मुद्दे या जोडपत्रात मांडण्यात आले आहेत.

Published on: Mar 14, 2023 09:39 AM