विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष, आदित्य म्हणाले, आम्हाला अपेक्षा

विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष, आदित्य म्हणाले, आम्हाला अपेक्षा

| Updated on: May 12, 2023 | 9:08 AM

ते म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाने हे देशद्रोह्यांचे सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्याच्या भ्रष्ट मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे असे आवाहन केलं.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकटावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. त्यानंतर शिंदे गटाने जल्लोष केला. तर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाने हे देशद्रोह्यांचे सरकार असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्याच्या भ्रष्ट मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे असे आवाहन केलं. त्यानंतर आता त्यांनी विधानसभा राहुल नार्वेकर यांच्याकडून अपेक्षा असल्याचे सांगत ते 16 अपात्र आमदारांचा विषय लवकर लवकर मार्गी लावतील असे म्हटलं आहे. ते घटनेला धरून निकाल देतिल. तर त्यांना कधी ना कधीतरी पक्षपातीच्या वरती येऊन काम करावे लागेल आणि ते तसं करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Published on: May 12, 2023 09:08 AM