अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा; धनंजय मुंडे नॉट रिचेबल

अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा; धनंजय मुंडे नॉट रिचेबल

| Updated on: Apr 18, 2023 | 11:28 AM

Maharashtra Political News :

मुंबई : राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आलाय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होतेय. आपल्या समर्थक आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय मु्ंडे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये. त्यामुळे धनंजय मुंडे अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान 2019 च्या पहाटेच्या शपथविधीवेळीही धनंजय मुंडे अजित पवार यांच्यासोबत असल्याचं बोललं जात होतं.

Published on: Apr 18, 2023 11:14 AM