Cabinet Expansion : मंत्री मंडळ विस्तार होणार? सामंत म्हणाले; ”मी तात्पुरता ”, कोण असेल रायगडचा नवा पालकमंत्री?
यादरम्यान आता घडामोडींना वेग आल्याचेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोलण्यावरून आता स्पष्ट होताना दिसत आहे. सामंत हे रायगड येथे बोलत होते. यावेळी त्यांनी आपण रायगड जिल्ह्याचे तात्पुरते पालकमंत्री आहोत असे सांगत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.
रायगड : राज्याच्या राजकारणातल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सरकारचं दुसऱ्या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असं बोललं जात आहे. यादरम्यान आता घडामोडींना वेग आल्याचेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या बोलण्यावरून आता स्पष्ट होताना दिसत आहे. सामंत हे रायगड येथे बोलत होते. यावेळी त्यांनी आपण रायगड जिल्ह्याचे तात्पुरते पालकमंत्री आहोत असे सांगत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. तसेच जिल्ह्याचा नवा पालकमंत्री कोण असेल याचे नाव ही जाहिर केलं. यावेळी सामंत यांनी भरत गोगावले हे विधानसभेचे आमदार आहेत ते भाग्यवान आहेत कारण रायगड हा त्यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे ते रायगडचे पुढचे पालकमंत्री असतील. तर पुढच्या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा पालकमंत्री भरतशेठ यांच्या नेतृत्वात व्हावा आशा त्यांना शुभेच्या देतोय असेही ते म्हणाले. त्यामुळे मंत्री मंडळाच्याविस्तारासह आता रायगड जिल्ह्याला भरत गोगावले यांच्या रूपाने नवा पालकमंत्री देखील मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.