Maharashtra Politics : काल शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत असणारे निलेश लंके म्हणतात…
अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि काही खासदार तेथे उपस्थित होते. यानंतर तेथून बाहेर पडत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.
अहमदनगर : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी दुसरा महाभूकंप घडवून आणला केला. अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि काही खासदार तेथे उपस्थित होते. यानंतर तेथून बाहेर पडत आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. याचवेळी अहमदनगरच्या पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे देखील राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार यांचे कट्टर मानले जाणारे लंके देखील अजित पवार यांच्या गटात गेल्याचे म्हटलं जात आहे. यावरून लंके यांनी एक फेसबुक पोस्ट केली. तसेच याचबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब असून शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आमचे नेते आहेत. तर हेच कुटुंब प्रमुख आहेत. मी फक्त या कुटुंबातील मी एक अतिशय छोटा घटक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर जेवढं अजित पवार आपल्यासाठी महत्वाचे आहेत तितकचं शरद पवार असेही ते म्हणालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते मंडळींनी एकत्र राहावं असेही त्यांनी म्हटलं आहे.