मुख्यमंत्री बदलांच्या संकेता वेळी अमित शाह पुन्हा एकदा मुंबईत; चर्चांना उधान, नेमकं कारण काय?

मुख्यमंत्री बदलांच्या संकेता वेळी अमित शाह पुन्हा एकदा मुंबईत; चर्चांना उधान, नेमकं कारण काय?

| Updated on: Apr 29, 2023 | 10:59 AM

यादरम्यानच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत असून नेतृत्व बदलांच्या चर्चांना उधान आलं आहे. याच्याआधी देखील ते नागपूर दौऱ्यावर येणार होते.

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) सध्या चांगलेच तापलेलं दिसत आहे. कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून (Barsu Refinery Project) वाद, जोडे प्रकल्पावरून वाद सुरू असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा होताना दिसत आहेत. यादरम्यानच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत असून नेतृत्व बदलांच्या चर्चांना उधान आलं आहे. याच्याआधी देखील ते नागपूर दौऱ्यावर येणार होते. मात्र, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय दुखवटा असल्यानं त्यांनी तो दौरा रद्द केला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या मुंबई दौऱ्यावरून तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत. यावेळी कोणती राजकीय चर्चा होईल का यावर अजूनही काही स्पष्टता आलेली नाही. मात्र अमित शाह हे त्यांच्या एका नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी मुंबई दौऱ्यावर येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Published on: Apr 29, 2023 10:59 AM