ठाकरेंच्या 'त्या' टीकेला शिंदेंसह शिंदे गटाकडून सडेतोड उत्तर; काय आहे प्रकरण?

ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला शिंदेंसह शिंदे गटाकडून सडेतोड उत्तर; काय आहे प्रकरण?

| Updated on: Apr 29, 2023 | 7:55 AM

राज्यात आत्ता आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. यावरूनच जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर घणाघाच केला.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) आता चांगलेचं तापतं चाललं आहे. आधी मुख्यमंत्री बदल्याच्या बातम्या त्यानंतर कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण सुरू झालं आहे. त्यातच बूट बनविण्याता प्रकल्प हा तामिळनाडूला गेल्याने तर विरोधक सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारवर (Shinde-BJP Government) त्याचे खापर फोडत आहेत. यावरून राज्यात आत्ता आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. यावरूनच जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत. महाराष्ट्राचं होणार काय? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे यांच्यावर घणाघाच केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आपल्या ट्विटमधून टीकेला सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. तर संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील असं जोरदार प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. इतकच काय तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत टोला लगावला. त्यांनी जोडे पुसून घेणं हे सरंजाम शाहीचं लक्षण आहे. तुमच्याबद्दल आदर आहे. याचा अर्थ तुम्ही वाट्टेल ते बोलाल असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या जोड्यावरून जोरदार राजकारण होत असून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे.

Published on: Apr 29, 2023 07:40 AM