बावनकुळे यांच्या टीकेवर अंधारे यांचा घणाघात, म्हणाल्या त्यांना बाजूला करण्यासाठीच फडणवीस यांनी...

बावनकुळे यांच्या टीकेवर अंधारे यांचा घणाघात, म्हणाल्या त्यांना बाजूला करण्यासाठीच फडणवीस यांनी…

| Updated on: May 12, 2023 | 4:08 PM

त्यांनी उद्धव ठाकरे यांनी जो राजीनामा दिला त्याची तुलना माजी पंतप्रधान दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी केली. तसेच देशाच्या इतिहासात असा राजीनामा देणारे उद्धव ठाकरे ही आहेत. त्याबद्दल त्यांचा अभिमान असल्याचं त्या म्हणाल्या.

मुंबई : सोलापूर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांचा आता रडोबा झाला. आता त्यांनी रडणे सोडावे, अशी टीका केली होती. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पटलवार केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जो राजीनामा दिला त्याची तुलना माजी पंतप्रधान दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी केली. तसेच देशाच्या इतिहासात असा राजीनामा देणारे उद्धव ठाकरे ही आहेत. त्याबद्दल त्यांचा अभिमान असल्याचं त्या म्हणाल्या. राहिला प्रश्न बावनकुळे यांचा तर जाऊद्या, बिचारे बावनकुळे यांना आधीच फडणवीसंकडून प्रचंड त्रास होतोय. त्यांना फडणवीस यांचा गट जेरीला आणत आहे. त्यामुळेच बावनकुळे यांना बाजूला करण्यासाठी फडणवीसांनी अध्यक्ष केलं. फडणवीस जेव्हा असा अध्यक्ष वगैरे करतात तेव्हा ते त्या व्यक्तीला बाजूला करण्यासाठीच करतात असा घणाघात अंधारे यांनी केला आहे.

Published on: May 12, 2023 03:42 PM