Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत सुसाट असणाऱ्या शहाजी पाटील यांचा सुचक इशारा; म्हणाले,”…मला”
कॅबिनेट विस्तारावरून शिंदे गटात कमालिची उत्सुकता पहायला मिळत आहे. तर भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहे. यादरम्यान या कॅबिनेट विस्तारात कोणा कोणाला संधी मिळणार यावर आता चर्चांना जोर धरू लागला आहे.
मुंबई : सध्या राज्याचं वारावरण आणि राजकारण हे मंत्रीमंडळ विस्तार आणि ईडीच्या चौकशीमुळे चांगलच तापलेलं आहे. कॅबिनेट विस्तारावरून शिंदे गटात कमालिची उत्सुकता पहायला मिळत आहे. तर भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहे. यादरम्यान या कॅबिनेट विस्तारात कोणा कोणाला संधी मिळणार यावर आता चर्चांना जोर धरू लागला आहे. याचदरम्यान अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह शिंदे गटातून संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे यांची नावं चर्चेत आहेत. तर भाजपकडून संजय कुटे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयांनी फरांडे आणि सीमा हिरे यांची नावं शर्यतीत आहेत. याचदरम्यान आता शहाजी पाटील यांचेही नाव आता आघाडीवर येत आहे. यावरून त्यांना विचारलं असता त्यांनी, कॅबिनेट विस्ताराचा जो काही निर्णय आहे तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. आम्हाला तो मान्य असेल. मी लहानपणापासूनच समाजामध्ये लोकांसाठी काम करतोय. यापुढेही मी चांगलं काम करत राहीन. मला भविष्यात जी जबाबदारी दिली जाईल मी ती जबाबदारी पार पाडेन, असं ते म्हणाले.