भाजप नेत्याच्या वक्तव्यावर एकनाथ खडसे सहमत, राजकीय चर्चांना उत
सीआर पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद आहे. या जातीवादामुळे महाराष्ट्राचा विकास होत नाही, असं म्हटलं आहे
जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात जातीवाद होतो अशी ओरड आधी मधी कानावर येत असते. याच्याआधी राज ठाकरे यांनी हा विषय उचलला होता. त्यापाठोपाठ आता याच मुद्दयावर भाजप देखिल बोलत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजप गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी जातीवादावर विधान केलं आहे. ते येथे एका खाजगी कार्यक्रमात बोलत होते. याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे ही असल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे.
सीआर पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद आहे. या जातीवादामुळे महाराष्ट्राचा विकास होत नाही, असं म्हटलं आहे. तर त्यांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी आपण सहमत असल्याचे म्हटलं आहे.
Published on: Mar 20, 2023 07:37 AM
Latest Videos