Maharashtra politics :  ...तर आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार!

Maharashtra politics : …तर आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार!

| Updated on: Jun 29, 2022 | 9:51 AM

औरंगाबाद विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव आज मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावाला विरोध झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजच राजीनामा देण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद विमानतळाच्या नामकरणावरून खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळास छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. प्रस्तावाला विरोध झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच राजीनाम देणार असल्याची माहिती समोर येत आहे.