Special Report | जयंत पाटलांचं वक्तव्य अजित पवारांचा टोला आणि तोंडाच साखर; काय सुरू आहे राष्ट्रवादीत
यादरम्यानच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री म्हणून पुढे आणल्याने अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दुरावा असल्याच्या बातम्या येत आहेत.
मुंबई : राज्याचे राजकारण (Maharashtra Politics) हे सध्या चांगलेच तापलेलं आहे. याला अनेक कारणं आहेत. त्यात भावी मुख्यमंत्री याचीही सांगड बसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच (NCP) आता भावी मुख्यमंत्री पदावरून रस्सी खेच होताना दिसत आहे. एका मुलाखतीत विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे म्हटलं आणि त्यांचे भावी मुख्यमंत्री या आशयाचे पोस्टर्स राज्यभर लागायला सुरूवात झाली आहे. यादरम्यानच राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री म्हणून पुढे आणल्याने अजित पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात दुरावा असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यातच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार असे म्हटल्याने अजित पवार यांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या तोंडात साखर पडो असे म्हटलं आहे. त्यामुळे साखर पडो या शुभेच्छा होत्या की टोमणा असा सवाल आता राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते विचारताना दिसत आहेत.