''त्यांच्या विरोधात लिहिले गेलं'', पण आता...; सावकार यांच्याबद्दल राज्यपाल बैस यांची प्रतिक्रिया

”त्यांच्या विरोधात लिहिले गेलं”, पण आता…; सावकार यांच्याबद्दल राज्यपाल बैस यांची प्रतिक्रिया

| Updated on: May 22, 2023 | 7:33 AM

बैस यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शाहिद कौस्तुभ राणे यांना अभिवादन करताना वीर सावकार महान क्रांतिकारक होते असं म्हटलं आहे. तर त्याचं कार्य महान आहे. त्यांचे विचार खूप मोठे आहेत. सावकार फक्त व्यक्ती नहीं तर एक विचार आहे.

मुंबई : राज्याचे जारकारण हे काही दिवसांपुर्वी स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्यावरून चांगलेच तापलेलं होतं. त्यानंतर ते आता शांत झालं आहे. मात्र यानंतर आता राज्यपाल रमेश बैस यांनी नवी घोषणा केली आहे. बैस यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शाहिद कौस्तुभ राणे यांना अभिवादन करताना वीर सावकार महान क्रांतिकारक होते असं म्हटलं आहे. तर त्याचं कार्य महान आहे. त्यांचे विचार खूप मोठे आहेत. सावकार फक्त व्यक्ती नहीं तर एक विचार आहे. त्यांनी देशासाठी दिलेला योगदान मोठं आहे. पण काही वेळा त्यांच्या विषयी विरोधात लिहिले गेलं. ते सगळं विसरून या ठिकाणी त्यांचे विचार पुढे नेले पाहिजेत, असे बैस म्हणाले. तर यावेळी त्यांनी सावरकर स्मारकासंदर्भात घोषणा केली. तसेच ते नाशिक येथे होईल असेही म्हणाले. तर 28 मे हा दिवस स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती आहे. याच दिवशी महाराष्ट्र सरकार सावरकर गौरव दिन साजरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर येणाऱ्या काळात सावरकर यांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात असेल. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सावरकर सखोल शिकवलं जाईल असेही ते म्हणाले. याच दिवशी नवीन संसद भवनचे उद्घाटन असल्याचेही ते म्हणाले.

Published on: May 22, 2023 07:33 AM