राऊत-अंधारे यांचे नाव घेत, आम्ही काही रिकामटेकडे नाही म्हणत शिवसेनेच्या नेत्याची सडकून टीका

राऊत-अंधारे यांचे नाव घेत, आम्ही काही रिकामटेकडे नाही म्हणत शिवसेनेच्या नेत्याची सडकून टीका

| Updated on: Apr 30, 2023 | 2:58 PM

खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे हे सातत्याने शिंदे गटावरही टीका करत असतात. यावरून आज मंत्री उदय सामंत यांनी राऊत-अंधारे यांच्यावर खोचक टीका केली.

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) हे उद्योगधंद्यावरून पेटलं आहे. त्यावरून ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल केला जात आहे. याचदरम्यान बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या वादानेही पट घेतल्याने ठाकरे गटाला आयतं कोलीत मिळालं आहे. यावरून खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) हे सातत्याने शिंदे गटावरही टीका करत असतात. यावरून आज मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राऊत-अंधारे यांच्यावर खोचक टीका केली. यावेळी सामंत यांनी, राग मानू नये, पण सकाळी उठल्यानंतर एक पत्रकार परिषद होते. त्यानंतर ताईंची एक प्रेस होते. दिवसभर यांच्या पत्रकार परिषदांना उत्तर देण्यात वेळ घालवावा असा एवढा रिकामटेकडेपणा आमच्यात आलेला नाही. आमची मंडळी आहे, त्यांना उत्तर देतील, असा टोला सामंत यंनी लगावला आहे.

Published on: Apr 30, 2023 02:58 PM