भाजपला सत्ता हवी तर राष्ट्रवादी घराणेशाही!; कोणाची टीका?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने तर राज्यात राजकीय भूकंपच आला आहे. आणि याचा फायदा भाजप उचलत आहे. गेल्या केही दिवसांपासून केंद्रीय मंत्र्यांचे दौरे राज्यात वाढलेले दिसत आहेत.
मुंबई : सध्या राज्यातल्या राजकारणाचे (Maharashtra Politics) चित्रन काही सरळ दिसत नाही. महाविकास आघाडी असताना शिवसेना आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अलबेल असल्याचे दिसत आहे. यातील नेतेच एकमेकांचा समाचार घेताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा दिल्याने तर राज्यात राजकीय भूकंपच आला आहे. आणि याचा फायदा भाजप उचलत आहे. गेल्या केही दिवसांपासून केंद्रीय मंत्र्यांचे दौरे राज्यात वाढलेले दिसत आहेत. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या आणि आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी भाजपसह राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे. राज्यात भाजपला पुन्हा सत्ता हवी तरप राष्ट्रवादीत घराणेशाही असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात यावी असे म्हणत कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का असा सवाल केला आहे.