Maharashtra Politics : झिरवाळ यांनी साधला नार्वेकर यांच्यावर निशाना, म्हणाले, ''किती दिवस तपास केला तरी... फक्त''

Maharashtra Politics : झिरवाळ यांनी साधला नार्वेकर यांच्यावर निशाना, म्हणाले, ”किती दिवस तपास केला तरी… फक्त”

| Updated on: May 27, 2023 | 3:04 PM

नार्वेकर यांनी शिवसेना कोणाचीसाठी प्रक्रिया सुरू करताना ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागवली आहे. तसेच नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीत योग्य त्या प्रक्रियांचा अवलंब करूनच लवकरात लवकर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे.

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाबद्दल निकाल देताना 16 अपात्र आमदारांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपविला. त्यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आपल्याकडे फक्त हे प्रकरण येऊदेच मग… असं म्हणत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता पुलाखालून बरेच पाणी गेलं आहे. तर नार्वेकर यांनी शिवसेना कोणाचीसाठी प्रक्रिया सुरू करताना ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागवली आहे. तसेच नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीत योग्य त्या प्रक्रियांचा अवलंब करूनच लवकरात लवकर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे. त्यावरूनच झिरवाळ यांनी प्रतिक्रिया देताना नार्वेकर यांनी टोला लगावला आहे. त्यांनी, राहुल नार्वेकर यांनी कितीही तपास केला तरी तपास म्हणजेच अपात्रतेचा निर्णय ठरलेला आहे, असे सूचक वक्तव्य केलं आहे. तर ‘लवकरात लवकर’ ही एक राजकीय व्यासपीठावरची किंवा सभागृहातील भाषा आहे. लवकरात लवकर याला कधीही लवकर म्हणता येते. परवाही लवकर आणि सहा महिन्यांनीही लवकरच असतो.

Published on: May 27, 2023 03:04 PM