maharashtra political crisis : 16 आमदारांच्या अपात्रतेत दोन गोष्टींनी अडचण? अध्यक्ष नार्वेकर हे प्रकरण कसं हाताळणार?

| Updated on: May 13, 2023 | 7:38 AM

मात्र निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने 16 अपात्र आमदाराचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवत त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी आपला निकाल दिला आणि शिंदे-फडणवीस सरकार कोसळता कोसळता वाचलं. ते ही फक्त उद्धव ठाकरे यांच्या एका चुकिमुळं. मात्र निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने 16 अपात्र आमदाराचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवत त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र ठाकरे गटाकडून अनिल परब यांनी हे 16 ही आमदार कसे अपात्र ठरणार याचे स्पष्टीकरणच दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देखिल हे आमदार अपात्र ठरणार असेच म्हटलं आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना विधानसभेत तरी आता न्याय मिळतो का हे पाहीलं जात आहे. मात्र असे असतानाच या प्रकरणात अध्यक्षांसमोर दोन पेच निर्माण झाले आहेत. एक आहे तो व्हीपचा आणि दुसरा आहे तो खरी शिवसोना कोणाची. यादोन्ही संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना उद्धव ठाकरे गटाचा पक्ष आणि त्यांचाच व्हीप महत्वाचा असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता अध्यक्ष आता काय आणि कसा निर्णय घेणार? त्यावर किती वेळ लागणार, कायदा तज्ज्ञांचे यावर मत काय यासह दावे आणि प्रतिदाव्यांवर हा हा स्पेशल रिपोर्ट

Published on: May 13, 2023 07:38 AM