maharashtra political crisis : 16 आमदारांचा निर्णय लांबणीवर? नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायलयाला का केलं पुढे? कोणती दिली डेडलाईन?
मात्र 16 आमदारांचं काय? हा सवाल होताच. त्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली. पण हे करत असताना न्यायालयाने, जुलै 2022 मध्ये काय परिस्थिती होती त्या आधारावर निर्णय घ्यावा, त्यावेळी शिवसेना पक्ष कुणाचा होता यावर आधी निर्णय घ्यावा असं सांगत मेख मारली.
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण हे सत्ता संघर्षामुळे वेगळ्या वळणावर गेलं होतं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिली आणि शिंदे सरकार राज्यात स्थिर झालं. मात्र 16 आमदारांचं काय? हा सवाल होताच. त्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवली. पण हे करत असताना न्यायालयाने, जुलै 2022 मध्ये काय परिस्थिती होती त्या आधारावर निर्णय घ्यावा, त्यावेळी शिवसेना पक्ष कुणाचा होता यावर आधी निर्णय घ्यावा असं सांगत मेख मारली. त्यामुळे ठाकरे गटाने हे 16 आमदार अपात्र होणारच त्यामुळे यावर लवकर निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांना निवेदन दिलं. त्याप्रमाणे आता कामकाज सुरू झालं आहे. मात्र यावर नार्वेकर यांनी काल एक वक्तव्य केलं ज्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहेतच तर ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. तर नार्वेकर असं काय म्हणाले ज्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट…