Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं मविआवर वक्तव्य! व्यक्त केली शंका?; म्हणाला, आता काँग्रेस राहणार की नाही…
कर्नाटकचा निकाल आसा आणि महाविकास आघाडीच भाजपवर तुटून पडली. आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी शिंदे गटासह भाजवर टीका केली. त्यानंतर शरद पवार यांच्या सिलव्हर ओकवर बैठक पार पडली ज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकिवर चर्चा झाली.
बुलढाणा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करण्यात आली होती. त्यानंतर कर्नाटकचा निकाल आसा आणि महाविकास आघाडीच भाजपवर तुटून पडली. आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांनी शिंदे गटासह भाजवर टीका केली. त्यानंतर शरद पवार यांच्या सिलव्हर ओकवर बैठक पार पडली ज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकिवर चर्चा झाली. यासर्व घटनाक्रमांदरम्यान शिंदे गटाचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच महाविकास आघाडीत आता काँग्रेस राहील की नाही अशी शंका उपस्थित केली. यावेळी गायकवाड यांनी, उद्धव ठाकरेंचा राज्यातील निवडणुकीशी काही संबंध उरत नाही. त्यांनी निवडणुकीवर भाष्य करू नये. तर काँग्रेसने कर्नाटकात एकट्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रातही कदाचित एकला चलाचा नारा देतील. कशाला राज्याची सत्ता चार लोकांना वाटून आपलं वाटोळ करून घेतील. काँग्रेस असं करणार नाही. तो खूप मोठा पक्ष आहे, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.