सत्ता संघर्षाच्या निकालावर भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी याचं सुचक वक्तव्य, म्हणाले...

सत्ता संघर्षाच्या निकालावर भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी याचं सुचक वक्तव्य, म्हणाले…

| Updated on: May 12, 2023 | 8:40 AM

निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. याचवेळी कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Politics Crisis) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिपण्या केल्या. याचवेळी कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. म्हणजे विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणावर निर्णय देणार आहे. त्यामुळे 16 आमदारांचा मुद्दा ही आता निकाली निघणार आहे. याचदरम्यान भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी काल आलेल्या निकालावर सुचक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भाजमध्येच चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी भंडारी यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि निरीक्षणं या दोन गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे निकाल पत्र पूर्ण पाहिल्याशिवाय त्यांनी निरीक्षणं कोणती आणि निकाल काय? याचा अभ्यास केल्याशिवाय याबद्दल काही बोलणं योग्य होणार नाही असं म्हटलं आहे.

Published on: May 12, 2023 08:40 AM